गुऴवेल

गुळवेल असा एक वेल आहे त्याच्या सेवनाने लाखो लोकांनी नविन जिवन अनुभवले आहे,हजारो लोकांचे प्राण मुळे वाचले आहेत तो वेल म्हणजे गुळवेल अर्थात अमृतवेल.आपण या वनस्पती बद्दल अनेक वेऴा एकलं असेल.आज आपणाला गुळवेल या आयुर्वेदीक वनस्पती बद्दल माहीती घेणार आहोत.या वनस्पतीला अमृतवेल गुळवेल म्हणून ओळखतात इंग्रजीत इंडीयन स्टीनोपोरा म्हणतात.हार्टलाव्ही स्टीनोस्पोरा असेही म्हणातात. हार्टलिव्ह स्टीनोपोरा का म्हणतात माहीत आहे का,कारण हिच्या पानाचा आकार पूर्ण पणे हदयाच्या आकाराचा आहे.आपण पहा आहे की नाही हदयाच्या आकाराचे पान म्हणूनच याला हार्टलिव्ह स्टीनोस्पोरा म्हणतात.या वनस्पतीला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या नावाने ओळखतात.बंगालीत सेगुंचा म्हणतात.पालोगदंचा म्हणतात.संस्कृत मध्ये वच्छादणी म्हणतात.शिंग्रृहा म्हणतात.गुडूची म्हणतात.मधुपर्णी.अमृतवल्ली त्रिका म्हणतात.ती विचार करण्यासारखी गोष्ठ आहे वनस्पती एकच आहे परंतू हीला नावे अनेक आहेत.कन्नड मध्ये अमृतावल्ली म्हणतात.युगानीवल्ली म्हणतात.आणी गोव्यात अमृतवेल म्हणतात.तेलगुत तिपत्ती म्हणतात.पंजाबीच गिलोह गुलरिच म्हणतात.मराठीत आपण गुऴवेल नावाने ओळखतो.मल्यालम भाषेत अमरितु म्हणतात.किंवा पेया अमृत म्हणतात.आरबी भाषेत गिलो म्हणतात.पारशीत गुळवेळ म्हणतात.तर साथींनो या पध्दतीने नावे अनेक आहेत.आपण याची नांवे एकली आता आपण या वेलाचे फायदे काय आहेत ते पाहु.मी आपणाला प्रत्यक्ष हा वेल दाखवत आहे कारण जे लोक नावा नुसार ओळखत नाहीत ते पाहुन निश्चीत ओळखतील.मित्रांनो ही वेलरूपी वनस्पती आहे
.जी खूप लांब पर्यंत झाडावर पसरलेला असतो.याची पाने पानाच्या आकाराची असतात.पान नाही समजल तर हद्ययाच्या आकाराचे समजा.या वेलाला फुल व फळे लागतात.लाल लाल गोल गोल हरब-या प्रमाणे मित्रांनो हा गुळवेल अक्षरशा: आपल्या साठी अमृत आहे.कारण आपल्या शरिररात होणा-या बहुतेक रोगांना मुळापासून नष्ट करण्याची ताकद या वेलात आहे..म्हणून आयुर्वेदाच्या ग्रंथात या गुळवेलाचे मोठे नांव आहे.म्हणून पहा मित्रांनो या औषधी वनस्पतीला पहा व ओळखा..आपण समजून घ्या गुळवेळाचा वेल कसा असतो.आणी मित्रांनो या वेलाच्या अनेक जाती असतता परंतू सगळ्या जातीत सगळ्यात औषधी जात लिंबावर वाढलेल्या गुळवेलाल समजली जाते..जो वेल लिंबाच्या झाडावर वाढला आहे त्याच्या आधाराने वाढला आहे तो वेल सर्वात जास्त औषधी समजतात.याच्या पाना बरोबर वेलाचा उपयोग होतो जास्त करून वेलाच्या कांड्यांचाच उपयोग होतो या कांड्या लवकर वाळत नाहीत व त्या वाळवून त्याची पावडर करून वापरता येते..तर मग मित्रांनो मि समजतो की आपण नक्की या वेलाला ओळखले असेल आपल्या शेताच्या बांधावर रानटी झुडपांवर हा सर्वत्र अढळतो. तर मग चला आपण आता याच्या फायद्याची चर्चा करू,तर मग पाहुया आपण आपल्या शरिरासाठी ही औषधी वेल किती फायदेशीर आहे.आणी आपण हिच्या पासून कोणकोणत्या रोगांना बरे करू शकतो.पहिल्यांदा सांगतो वेदना सूज व ताप यावर खूप गुणकारी आहे.याच बरोबर शरिरातील शक्ती ताकद वाढवण्याचे काम करते.काविळ रोगाला पूर्णपणे बरे करते,श्वसनविकारात फायदेशिर आहे.टाइफाईड तापात याचा चांगला उपयोग होतो ताप लवकर उतरतो.भूक वाढण्यासाठी पाचकतत्व म्हणून काम करते.म्हणजे आपल्या शरिरात जेवढे रोग आहेत त्यांना बरे करण्याची ताकद या चमत्कारीक औषधी वनस्पतीत आहेत.ज्या लोकांना या वनस्पतीचे उपयोग माहीत आहेत ते लोक याचा आवश्य वापर करतात. आपण आता सविस्तर पणे पाहु कि कोणत्या रोगात कोणत्या पध्दतीने तिचा वापर केला जातो.ज्यांवा कावीळ झाली आहे त्यांनी हा वेल तोडून त्याचे लहान लहान तुकडे करून  दो-यात सुइ पासून दो-यात ओवून  गळ्यात माळ करून घातल्यास किंवा कमरेला बांधल्यास काविळ रोग बरा होईल
.येवढी उपयोग आहे.या वेलाचा स्पर्श शरिराला होताच तिचा फायदा सुरू होतो.याचे वेलाचा तकड्यांचा 20 ते 25 मिली  रस काढून सकाळी सकाळी रिकाम्या पोटी पिल्यास काविळ रोगात मोठा फायदा होतो.आणी ताप उतरवण्यासाठी उपयोग होतो.ज्यांना ताप किंवा टाईफाईड झाला आहे त्यांनी याच्या काड्यापासून तयार केलेला 20 ते 25 मिली रस पिल्यास निश्चीत फायदा होतो.मधूमेह रोगात याच्या पाना पासून व काड्यापासून 20 ते 25 मीली रस वापरा मधूमेह शुगर बरा होतो.डोळ्याच्या विकारात या वेलाच्या पानाचा व काड्य़ाचा तयार केलेला 10 मिली रस व एक ग्रॅम सौधव मिठ व एक ग्रॅम मध मिसळून चांगले खलून घ्या व डोळ्यात काजळा प्रमाणे लावल्यास आपल्याला माहीत आहे डोळ्याचे किती रोग ठिक होतात.रातआंधळे सायंकाळी दिसत नाही,डोळ्यात मोती बिंदू उत्पन्न झाला आहे.डोळ्याची जळजळ होते डोळे लाल होतात.आता आपणाला समजले असेल डोळ्यात उत्पन्न होत असलेल्या सगळ्यात रोगांवा बरे करण्याची शक्ती या गुळवेलात आहे.असा बहुउपयोगी हा गुळवेल आहे मित्रांनो काढा तयार करूनही याचा उपयोग केला जातो.या गुळवेळाची पाने आणून 200 मिली पाण्यात उकळा निम्ने पाणी शिल्लक राहील्यावर ते आंचे वरून उतरवा व थंड करा.व ज्या वेळी हे पाणी थंड होईल त्यात 20 मिला मध टाका,व एक ग्रॅम पिंपळीचे चूर्ण टाका व चांगले मिश्रण एकजिव करून पिऊन टाका.यामुळे पण डोळ्याचे तेज वाढते,मित्र मैत्रिणींनो याची काडी उगाळून ते मिश्रण चमच्यात घेवून थोडे गरम करा व दुख-या कानात दोन तिन थेंब टाकल्यास दुखणारा कान ही बरा होतो..ज्यांना उचकी लागली आहे त्यांना गुळवेलाच्या कांडीचे मिश्रण व सुंठ  एकत्रीत करून ते नाकाच्या बाजूला लावून आपण त्याचा वास घेतल्यास उचकी बंद होते.किंवा गुळवेलाची कांडीचा लगदा व सुंठ दुधात टाकून पिल्यास उचकी ताबडतोप बंद होते.टि बी रोगातही याचा उपयोग होतो तोही गुळवेलाच्या वापराने बरा होतो.फक्त आपल्याला काय करायचे अश्वगंधा,गुळवेल, शतावरी, बालामुळ, आडुळसा,पोहकरमुळ त्याच बरोबर अतिष या सर्वांना सारख घेवून दोनशे मिली पाणी टाकून चांगळ्या उकळवा व अर्धे पाणी राहील त्यावेळी खाली उतरवा व त्यातून विस ते तिस मिली काढा काढून घ्या.व तेवढा सकाळ संध्याकाळ टि बी झालेल्या माणसाला प्यायला द्या.टि बी रोग बरा होतो,मित्रांनो गॅस अपचन अॅसिडीटी या विकारात गुळवेळ खूप गुणकारी आहे.जर एखाद्याला भुक लागत नसेल तर गुळवेळाची मुळे कांड्या पाने वाटून पाण्यात टाकून पिल्यास भूक वाढण्यास मदत होते.गुळवेळाची चव कडवट असते जर तो पसंत नसेल तर त्यात मध टाकूनही पिल्यास चालते.ज्यांना मधूमेह आहे त्यांनी पाने व कांड्या कुटून त्याचा रस रोज सकाळी सकाळ संध्याकाळ पिल्यास दोन महीन्यात मधूमेह नियंत्रात येतो.लघवीच्या रोगातही याचा उपयोग चांगला होतो पाच ग्रॅम गुळवेळाची पावडर पाच गॅम धन्याची पावडर व पाच ग्रॅम हरळी घेवून अर्धा लिटर पाण्यात उकळवा व तिसरा हिस्सा पाणी जळून जावून एक हिस्सा पाणी राहील्यास समजा काढा तयार झाला.तो सकाळ संध्याकाळ पिल्यास बवासिर मध्ये उपयोग होतो.गुळवेल शरिरातील विषारी पदार्थ काढून टाकते शरिर शुध्दीसाठी त्याचा उपयोग होतो शरिरात उत्पन्न होणारे कुष्ठरोग त्वचा रोग नष्ठ करते.पाच ग्रॅम गुळवेळाचा लगदा पाच ग्रॅम कोरपडीचा गर किंवा पाच ग्रॅम पावडर  पाच ग्रॅम तुळसीची पाने किंवा पाने एक ग्रॅम हळद टाकून पिल्यास शरिर रक्त साफ होते.शरिराची खाज होत असेल तरीही त्याचा उपयोग होतो.गुळवेळाचा रसही विकत मिळतो तो रस  पाच ग्रॅम घेवून त्यात पाच ग्रॅम आवळ्याचा पाच ग्रॅम तुळसी पाच ग्रॅम कोरपडीचा रस एकत्रीत करून दोन वेळेस पिल्यास  जेवढे त्वचा विकार आहेत ते सगळे बरे होतात.त्याच बरोबर ताबडतोप शरिराची खाज बंद होते मित्रांनो.हदय विकारातही मोठा फायदा गुळवेळाचा होतो.गुळवेळाची पावडर तिन ग्रॅम काळ्या मिरीची पावडर तिन ग्रॅम कोमट पाण्याबरोबर पिल्यास डोक्याच्या व हदयाच्या वेदना थांबतात.कॅन्सच्या वाढणा-या पेशी नियंत्रीत करण्याचेही काम गुळवेळ करते.त्याच बरोबर गुळवेळाच्या सेवनाने शरिराची स्टॅमिना पावर वाढते.शरिरात होणारे बहुतेक सगळे रोग नष्ठ होतात..शरिरातील रोग नष्ठ झाल्याल आपण आरोग्य संपन्न होतो...आपल्या आजुबाजूला उपलब्ध असलेल्या या बहुपयोगी वनौषधीला ओळखा व उपयोगात आणा निश्चीतपणे आपल्याला त्याचा उपयोग होईल...आपल्या शेताच्या बांधावर हा बहुपयोगी गुळवेल अमृतवेल नसेल तर ज्या ठिकाणी मिळेल तेथून जाडसर वेल काढून आणा त्याचे कडे करून लिंबाच्या झाडाखाली लावा चार सहा महीन्यात आपल्याही शेतात गुळवेळाचा वेल येईल व आपल्याला त्याचा औषधी उपयोग करता येईल,,ही माहीती कशी वाटली ते कॅामेट मध्ये लिहा आवडली असेल तर लाईक करा व मित्रांना शेअर करा.



.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट